वरणगावात सावत्र आईचा मुलानेच केला विनयभंग

In Warangaon, the stepmother was molested by her son वरणगाव : पत्नीसह मुलाला का मारहाण केली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सावत्र मुलाने आईचा विनयभंग केल्याची घटना शहरातील एका भागात घडली. या प्रकरणी संशयीत तरुणाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा
35 वर्षीय पीडीत महिलेच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चहा बनविण्यावरून झालेल्या वादानंतर पत्नी व मुलाला का मारले? याचा जाब विचारून सावत्र मुलगा तथा संशयीत आरोपी शुभम उर्फ सोन्या दीपक कांबळे यांनी आईला चापट्याबुक्यांनी मारहाण करीत मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा आरोप आहे. तपास सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.