वरणगाव। हनुमान जयंती उत्सवानिमीत्त कुस्त्याची आमदंगल हनुमान व्यायम शाळेच्यावतीने 16 रोजी महात्मा गाधी विद्यालयाच्या पंटागणांवर आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्षा अरूणा इंगळे, सुनील बढे, उपनगराध्यक्ष शेख अरवलाख, तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे, पालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक अशोक कडलग, एपीआय दिलीप गांगुर्डे, चंद्रकांत बढे, प्रमोद सावकारे, गणेश झोपे आदी उपस्थित राहणार आहे.
कय्युम पहेलवान व श्रीराम पहेलवान मानकरी ठरणार आहे. आयोजक हनुमान व्यायम शाळेचे पदाधिकारी अध्यक्ष सुनील काळे, उपाध्यक्ष शामराव धनगर, सदस्य नामदेव मोरे, उत्तम पहेलवान, एकनाथ भोई, राजेंद्र गुरचळ, प्रताप दिव्यविर, ज्ञानेश्वर छाटोळे, इफ्तेखार मिर्जा या यांसह नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, व्यायमशाळेचे सदस्य व पहेलवान परिश्रम घेत आहे.