जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना यश ; नगराध्यक्षांनी मानले आभार
वरणगाव- वरणगावात विकासकामे होण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नानंतर नगरपरीषदेला विशेष अनुदान म्हणून दोन कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आहे. या निधीतून शहरात वॉटर पार्कचे काम केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली. राज्याचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी 3 ऑक्टोबर रोजी निधी देण्यासंदर्भात आदेश काढले आहेत.
वरणगावात होणार वॉटर पार्क
शहरात वॉटर पार्क व जलतरण तलावाच्या निर्मितीसाठी काळे यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता तर महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली होती. वैशिष्ट्यपूर्ण योजनेेतून यापूर्वी तीन कोटी रुपये मिळाल्याने शहरात व्यायामशाळा, जिम्नॅशियम हॉल, मल्टीपर्पज हॉल यासह अन्य विकासकामे होणार आहेत. शिवाय वॉटर पार्कसाठी दोन कोटींचा निधी मिळाल्यानंतर नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेक युसूफ, नगरसेविका माला मेढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे विष्णू खोले, गणेश चौधरी यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांचे आभार मानले आहेत.