वरणगावात 27 रोजी स्त्री रोग व डोळे तपासणी शिबिर

0

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

भुसावळ- राज्याचे संकटमोचक तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, 27 मे रोजी वरणगाव शहरातील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात महाआरोग्य शिबिर नेत्र तज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत होत आहे. प्रसगी मोफत डोळे तपासणी, ऑपरेशन व चष्मा वाटप तसेच मुंबई येथील डॉक्टरांच्या उपस्थित स्त्री रोग तपासणी, दातांची तपासणी व उपचार मोफत केले जाणार आहेत.

शिबिरासाठी नावे नोंदवण्याचे आवाहन
आरोग्य दूत रामेश्वरभाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी रुग्णांनी नाव नोंदणी करावी व नगरपरीषद कार्यालयात तसेच नगराध्यक्ष सुनील काळे जनसंपर्क कार्यालय, जगदंबा नगर अजय पाटील, संत कृपा मेडिकल, संजयकुमार जैन, पद्माई जनरल स्टोअर्स, वरणगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे.