वरणगाव- नगरपरीषदेच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनापासून तर 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानाचा समारोप गुरूवार, 4 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी विद्यालयात सायंकाळी सात वाजता राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनातून होणार आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ या विषयावर जाहीर कीर्तन होणार असून वरणगाव शहर व परीसरातील नागरीकांनी कीर्तनाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्यधिकारी सौरभ जोशी यांनी केले आहे.