जलसंपदा मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगावात विकासाचे पर्व -सुनील काळे
वरणगाव- शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत गोर-गरीबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे सोयीचे जावे यासाठी बुधवारी वरणगाव शहरात 607 रेशनकार्डचे वितरण करण्यात आले. जिल्हा परीषद मराठी मुलांच्या शाळेत झालेल्या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुनील काळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना काळे यांनी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार वरणगाव शहर विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. हा विकास साधताना शहरातील गोरगरीबांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल? यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून वंचितांना रेशनकार्ड मिळावे म्हणून 2 जुलैला शहरात शिबिर घेतले होते. यानुसार बुधवारी 607 अर्जदारांना नियमानुसार रेशनकार्ड मिळवून दिले. या कार्ड धारकांना धान्य मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यांची होती उपस्थिती
नायब तहसीलदार संजय तायडे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी सौरभ जोशी, गट नेते राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, नगरसेविका प्रतिभा चौधरी, वैशाली देशमुख, तालुक्याचे पुरवठा अधिकारी आर.के.पवार, अलाउद्दीन शेख, शेख सईद, शामराव धनगर, मिलिंद मेढे, ज्ञानेश्वर देवघाटोळे, ईरफान पिंजारी, कस्तुराबाई इंगळे, नामदेव मोरे, साजीद कुरेशी, पालिका कर्मचारी राजू गायकवाड, दीपक भंगाळे, कृष्णा माळी उपस्थितीत होते. सूत्रसंचालन संजय माळी यांनी केले.