वरणगाव- वरणगाव आयुध निर्माणीने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत उत्कृष्ट उर्जा प्रबंधन, झिरो कार्बन उत्सर्जन करून उत्पादन केल्याने आयुध निर्माणीला राष्ट्रीय बचत उर्जा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबतची माहिती अपर महाप्रंबधक राजीव गुप्ता यांनी दिली. मे महिन्यात दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात महानिर्देशक अजय माथुर यांच्या हस्ते आयुध निर्माणीच्या वतीने कार्य प्रबंधक मो.फारूकी व कनिष्ठ कार्यप्रबंधक पी.के.झा यांनी पुरस्कार स्वीकारला.
यांची होती उपस्थिती
प्रबंध निर्देशक सौरव कुमार, एनर्जी एकॉनॉमिस्ट के.के.चक्रवर्ती आदींची उपस्थिती होती. वरणगाव आयुध निर्माणीचे महाप्रबंधक एस.चटर्जी यांनी हा पुरस्कार कर्मचारी, अधिकारी यांच्या अथक मेहनत, प्रशिक्षण मशनरीचा योग्य वापर केल्याने मिळाला असल्याचे सांगितले. ऊर्जा बचतीमुळे आमच्या उत्पादनाची गुणवत्ता कायम राहील व रेट कमी होण्यास मदत होणार आहे तर या पुरस्कारात सर्वांचा सहभाग असून ऊर्जा बचत ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.