वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी भाजपाचे घेराव आंदोलन

सोमवारपर्यंत लस उपलब्ध होणार : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण

वरणगाव : कोविड 19 प्रतिबंधक लस संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलीतरी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात ती उपलबध नसल्याने शनिवारी भाजपा पदाधिकार्‍यांनी घेराव आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.क्षितीजा हिंडवे व कामगार नेते मिलिंदजी मेढे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील माळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष माळी, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, नगरसेविका माला मेढे, महिला मोर्च्यांच्या शहराध्यक्ष प्रणिता पाटील-चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, भाजपा नेते शामराव धनगर, हिप्पी सेठ, संदीप भोई, संदीप माळी, कृष्णा माळी, पप्पू ठाकरे, ज्ञानेश्वर घाटोळे, गजानन वंजारी, आकाश निमकर, डॉ.प्रवीण चंदने, युसूफ खान, भाऊलाल टिंटोरे, मिलिंद भैसे, हितेष चौधरी, राहुल जंजाळे, जयेश कपाटे, गणेश चौधरी, कमलाकर मराठे, अरबाज पहेलवान आदी उपस्थित होते. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ.क्षितीजा हिंडवे म्हणाल्या की, निवेदनाची दखल घेउन लवकरात-लवकर लसीकरणाला सुरवात होईल.