वरणगाव जिल्हा परीषद शाळेची जागा नगरपरीषदेला द्यावी

0

वरणगाव नगराध्यक्षांचे ग्रामविकास मंत्र्यांना साकडे ; विकासकामांचा आढावा

भुसावळ- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची गुरुवारी औरंगाबाद येथे वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, रमेश पालवे, किरण धुंधे आदींनी भेट घेत वरणगाव नगरपरीषदेच्या विविध मागण्यांबाबत निवेदन दिले. वरणगाव जिल्हा परीषदेची जागा नगरपरीषदेला देण्याची मागणी प्रसंगी निवेदनाद्वारे करण्यात आली. शाळेच्या खोल्या पडक्या अवस्थेत असल्याने या खोल्या पाडण्याचे आदेश देण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली.

अद्ययावत शाळेची मागणी
जिल्हा परीषदेची मराठी मुला व मुलींची वापरात नसलेली शाळेची भव्य जागा नगरपरीषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी व व्यापारीसंकुल बांधण्यासाठी खास बाब म्हणून देण्यात यावी व त्याबदल्यात शाळेत असलेल्या सद्यस्थितीत उपस्थिती विद्यार्थी संख्येनुसार नगरपरीषदेकडून वेगळ्या ठिकाणी शाळा बांधून द्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष काळे यांनी प्रसंगी केली. मुंडे यांनी मागणीबाबत सकारात्मक दखल घेण्याचे प्रसंगी आश्‍वासन दिला तसेच वरणगाव नगरपरीषदेला आजपर्यंत विकास कामांसाठी किती निधी आला व किती निधी खर्च झाला तसेच वरणगावात काय-काय विकासकामे झाली याबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेतला. वरणगाव नगरपरीषदेच्या आयोजित कार्यक्रमाला येण्याचे आश्वासन प्रसंगी पंकजा मुंडे यांनी शिष्टमंडळाला दिले.