जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रधान सचिवांना सूचना
वरणगाव- नगरपरीषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकार्यांसह बांधकाम, इलेक्ट्रिक, लेखा, अभियंता व अधीक्षक ह्या जागा रीक्त असल्याने विकासकामे करतांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याने तातडीने सर्व रीक्ते भरण्याबाबत वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मंगळवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना साकडे घातल्यानंतर मंत्री महाजन नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हस्कर यांना प्रत्यक्ष बैठकीत तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिकार्यांसह रीक्त पदे भरण्यासंदर्भात सूचना केल्या.
कर्मचार्यांच्या समायोजनाबाबत सूचना
मंत्री महाजन म्हणाले की, वरणगावची लोकसंख्या 50 हजारांच्या जवळपास असून नागरीकांची विविध कामांसाठी कायमस्वरूपी मुख्यधिकारी व इतर पदे रीक्त हाल होत आहेत. वरणगाव नगरपरीषदेला कायस्वरूपी तातडीने मुख्यधिकारी देण्यात यावा तसेच बांधकाम अभियंता, इलेक्ट्रिक अभियंता लेखाधिकारी, कार्यालयीन अधीक्षक यासह रीक्त पदे व नगरपरीषदेचा कर्मचारी यांचा आकृतिबंध 100 टक्के भरणे आवश्यक असून कर्मचारी आंदोलन करीत असल्याने तत्काळ लक्ष घालून कर्मचार्यांचे शंभर टक्के समायोजन करण्याच्या सूचना प्रधान सचिव मनीषा म्हस्कर, नगरविकास विभागाचे उपसंचालक डी.पी.मोरे यांना केल्या.