वरणगाव। नगरपलिकेला शासनाकडून आलेला साडेदहा कोटींचा निधी माजी मंत्री एकनाथराव खडसे व भुसावळ विधानसभेचा आमदार म्हणून कोणत्याही परिस्थितीत परत जाऊ देणार नाही, असे आश्वासन आमदार संजय सावकारे यांनी येथे दिले. वरणगाव शहरात हायमास्ट पथदिव्यांच्या उद्घाटनप्रसंगी वॉर्ड क्रमांक 10 मध्ये झालेल्या सत्कार समारंभाप्रसंगी आमदार संजय सावकारे बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे उपस्थित होते.
वरणगाव शहराचा निश्चित होणार कायापालट
प्रास्ताविक गटनेता सुनील काळे यांनी केले. सुत्रसंचालन मीनाक्षी चौधरी यांनी केले. कार्यक्रमात आमदार सावकारे म्हणाले की, वरणगाव नगरपालिका होण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली. वरणगाव शहराच्या विकासाला सुरवात ़झाली आहे तसेच जिल्ह्यात भुसावळ विधानसभा मतदरसंघातील वरणगाव नगरपालिका ही विकासाच्या दृष्टीने सर्वात पुढे आली पाहिजे यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. क्रीडा संकुलासह संपूर्ण नवीन वस्तीतील रस्ते, गटारी, सामाजिक सभागृह बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
समस्या सोडवण्याची ग्वाही
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार एकनाथराव खडसेंसोबत भेटून वरणगाव नगरपालिकेलचा निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न कारणार असल्याचे आमदार सावकारे म्हणाले. वरणगाव शहराच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध आहे, जनतेने आपल्या समस्या थेट माझ्याकडे घेऊन या त्या सोडविण्याचे हमखास प्रयत्न केले जातील, असेही आमदार सावकारे म्हणाले.
या भागात हायमास्ट
शहरातील सरस्वती नगर, मच्िंछद्र नगर, लुंबिनी नगर, अक्सा नगर, तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर, मुंजोबा मंदिर, खिड़की दरवाजा येथील हायमास्टचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गणेश धनगर, कामगार नेते मिलिंद मेढे, संभाजी देशमुख, सुनील बढे, नामदेव मोरे, सहा.पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी उपस्थित होते. हितेश चौधरी, धीरज रुणवाल, एस.एम.पाटील, अरुण चौधरी, सचिन मेथालकार, नीलेश सुरळकर, कमलाकर मराठे, कैलास पाटील, तेजस जैन, प्रशांत तायड़े, चेतन तायडे, माउली सोनार, रुपेश सैतवाल, राहुल बविस्कर, स्वप्निल पाटील आदींनी परिश्रम घेतले.