वरणगाव- नव्याने तयार झालेल्या वरणगाव नगरपालिकेत यंदाच्या वित्तीय वर्षात अवघी 40 टक्के वसुली झाली आहे. या प्रकाराला अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. वरणगाव नगरपालिका हद्दीत सर्वच वॉर्डात विकासकामे जोमाने सुरू आहे परंतु शासन तिजोरीत भरली जाणारी पाणीपट्टी व घरपट्टी वसूली होण्यास विलंब होत आहे. वरणगाव नगरपालिकेचे वसूली कर्मचारी दररोज दप्तर घेवून वसूलीसाठी फिरत असलेतरी त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग नसल्याने पाहिजे तेव्हढी होत नसल्याचे सांगितले जात आहे.
मार्चनंतरही केवळ 40 टक्के वसुली
पालिका कर्मचार्यांना पुरेसे अधिकार नाही त्यामुळे मार्च अखेर वरणगाव पालिकेची घरपट्टी 74 लाख 92 हजार 316 तर पाणीपट्टी एक कोटी 21 लाख 69 हजार 439 रुपये नागरीक व व्यावसायीकांकडे थकीत आहे. मार्च महिना संपत आला असून केवळ 40 टक्के वसूली झाल्याने उर्वरीत थकबाकी केव्हा वसुल होणार ? याकडे लक्ष लागले आहे. वसूलीचे संपूर्ण अधिकार अधिकार्यांना असतांना अधिकारी केवळ वेळ मारून नेत असल्याने अल्प वसुलीमुळे पुढील विकासकामांमध्ये अडथळा येण्याची भीती आहे.