वरणगाव नगरपालिकेचे कर्मचार्‍याचे उद्या बेमुदत काम बंद आंदोलन

0

वरणगाव- महाराष्ट्र राज्य शासनाने नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे वरणगाव नगरपालिकेचे 125 कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन 1 जानेवारीपासून छेडणार आहेत. गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र शासन नगर परीषद कर्मचार्‍यांची दिशाभूल करीत असल्याने मंगळवार, 1 जानेवारीपासून बेमदत संपावर जाणार आहे.

या मागण्यांसाठी आंदोलन
नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना आकृती बंधात समाविष्ट करावे, सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी, रोजदारी कर्मचारी यांचे विनाअटी प्रमाणे नगरपंचायतीमध्ये समादेशन करणे, सेवानिवृती वेतन लाभासाठी करणे, जुनी पेशन् योजना लागू करणे अशा विविध मागण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजेपासून कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करण्यात आले मात्र महाराष्ट्र शासने कर्मचार्‍यांची कोणतीच दखल न घेतल्याने 1 जानेवारीपासून कर्मचारी बेमुदत संपावर जात असल्याचे भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अनंत गडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळवले आहे.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात कर्मचारी मुक्तार अहमद खान, मेघराज चौधरी, राजेंद्र धनगर, रमेश कोळी, निलेश झांबरे, सुरेश शेळके, जतीन सपकाळे, रवी इंगळे, महेंद्र मोरे, सुभाष जोहरे, कमलाकर सुरवाडे, प्रमोद भोळे, गणेश कोळी, संजय माळी, सुधाकर मराठे, रवींद्र सोनार, अनिल तायडे, सुरेखा मराठे, मालिनी सोनवणे, योगेश धनगर, राजेंद्र भोई, बाबुलाल भोई, वासुदेव भोई, प्रल्हाद कोळी, गंभीर कोळी, अशोक इंगळे, गोकुळ भोई, विजय मराठे , कृष्णा माळी, राजू गायकवाड, अनिल चौधरी, प्रमोद बावणे आदी कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत.