वरणगाव- महाराष्ट्र राज्य शासनाने नगरपरीषद कर्मचार्यांचा सातवा वेतन, रोजंदारी कर्मचारी कायम करणे, सफाई कामगार, संगणक ऑपरेटर, पाणीपुरवठा, रोजंदारी कर्मचार्यांचा विनाअट नगरपंचायतीत सादेशन करावे, सफाई विभागाची ठेका पध्दत बंद करावी, जुनी पेशन् योजना लागू करणे अशा विविध मागण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजेपासून कर्मचार्यानी काळ्या फितीं लावून कामबंद आंदोलन केले. 1 जानेवारीपर्यंतत आंदोलन सुरूच राहणार आहे.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात कर्मचारी मुक्तार अहमद खान, मेघराज चौधरी, राजेंद्र धनगर, रमेश कोळी, निलेश झांबरे, सुरेश शेळके, जतीन सपकाळे, रवी इंगळे, महेंद्र मोरे, सुभाष जोहरे, कमलाकर सुरवाडे, प्रमोद भोळे, गणेश कोळी, संजय माळी, सुधाकर मराठे, रवींद्र सोनार, अनिल तायडे, सुरेखा मराठे, मालिनी सोनवणे, योगेश धनगर, राजेंद्र भोई, बाबुलाल भोई, वासुदेव भोई, प्रल्हाद कोळी, गंभीर कोळी, अशोक इंगळे, गोकुळ भोई, विजय मराठे, कृष्णा माळी, राजू गायकवाड, अनिल चौधरी, प्रमोद बावणे आदी कर्मचारी उपस्थित होते.
भुसावळातही काळ्या फिती लावून कामकाज
भुसावळ- पालिकेतील कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला मात्र शनिवारी कर्मचार्यांनी कामकाज सुरूच ठेवले.