वरणगाव नगराध्यक्षांचे भोगावतीनदीचे काम सुरू करण्यासाठी नदीपत्रात तीन तास ठिय्या आंदोलन

0

वरणगाव- नगरपरिषदेने केलेल्या मागणी नुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशाने व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या प्रयत्नाने वरणगाव शहरातून जाणार्‍या भोगावती नदी पात्राचे खोलीकरणाचे काम मंजूर झाले. कामाला सुरुवात सुद्धा झाली. पश्चिमेकडील भोगावती नदी पुलाच्या पलीकडे खडकडी दरम्यानचे खोलीकरणाचे काम पाणी असल्याने व राजकीय दबावामुळे करणार नाही, अशी भूमिका गरवारे कंपनीने घेतल्याने शुक्रवारी मॅनेजर जिगोल किशोर व समनव्याक अरुण सोनवणे यांनी घेतल्याने नगराध्यक्ष सुनील काळे यांनी उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक राजेंद्र चौधरी , इरफान पिंजारी, साजीद कुरेशी, कामगार नेते मिलिंदजी यांच्या सोबत भोगावती नदीत तब्बल तीन तास हजारो नागरीकांसोबत आंदोलन केले. अधिकार्‍यांच्या तीन तास गाड्या अडवून जो पर्यंत नदी खोलीकरणाच्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत हलू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली तर गरवारे कंपनीचे मॅनेजर जुगल किशोर यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली.

जेसीबीने कामास सुरुवात झाल्यानंतर आंदोलन
वातावरण अधिक तापत गेल्याने प्रचंड जनसमुदाय जमा झाला जो पर्यंत राजकीय पुढार्‍यांनी स्वार्थासाठी बंद पाडलेले काम म सुरू करत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे होणार नाही ही भूमिका उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे मांडण्यात आली. जेसीबी मशनरी भोगावती नदी पात्रात आल्यावर काम सुरु झाल्यावर प्रशारनाच्या विनंतीवरून आंदोलन थांबवण्यात आले.