वरणगाव नगराध्यक्षांसह माजी सभापतींनी केली जि.प.शाळेची पाहणी

0

वरणगाव- भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती सुनील नेहते यांच्यासह वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हा परीषदेच्या शाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली. जिल्हा परीषद शाळेच्या दुरवस्थेविषयी प्रसंगी चिंता व्यक्त करण्यात आली. नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पडक्या अवस्थेतील शाळा पाडण्यासाठी जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन व अतिरिक्त मुख्यधिकारी संजय म्हस्कर यांना निवेदन दिल्याचे सांगत आपणत त्यात लक्ष घालावे, अशी विनंती केली. माजी सभापती सुनील नेहते यांनी गटशिक्षणाधिकारी यांना फोन लावून वरणगाव जिल्हा परीषद शाळेच्या बाबतीत तत्काळ लक्ष घालण्याच्या सूचना व वरणगांव जिल्हा परीषद शाळेला भेट देण्याची करीत पडक्या शाळा पाडण्याच्या कारवाईला गती देण्याबाबत माजी सभापती नेहते यांनी सांगितले. प्रसंगी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, सामाजिक कार्यकर्ते इरफान पिंजारी तसेच केंद्रप्रमुख बर्‍हाटे, मुख्याध्यापिका मराठे, शिक्षक सुरेंद्र सपकाळे, मनोज सपकाळे व नगरपरीषद कर्मचारी कृष्णा माळी उपस्थित होते.