वरणगाव नागेश्वर महादेव मंदिरासाठी दोन कोटी 73 लाखांचा निधी मंजूर

0

नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जलसंपदा मंत्र्यांसह आमदार संजय सावकारेंचे मानले आभार

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव शहरातील नागेश्‍वर महादेव मंदिराच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांसह पर्यटन मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली होती. या मागणीच्या पाठपुराव्याला यश आले असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी दोन कोटी 73 लाख रुपयांच्या निधीला राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मंजुरी दिल्याची माहिती नगराध्यक्षांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली.

नागेश्‍वर महादेव मंदिराचा होणार विकास
नगराध्यक्ष काळे म्हणाले की, एकूण चार कोटी 95 लाखांचा प्रस्ताव वरणगाव नगरपरीषदेच्या वतीने सादर करण्यात आला होता. नागेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी तब्बल दोन कोटी 73 लाख मंजूर केल्याने वरणगाव परीसरातील भाविकांना मोठ्या प्रमाणावर सोयी-सुविधा आता पुरवता येणार आहेत. या निधीतून 90 लाखांचा सभा मंडप, 12 लाखातून शौचालय सेच रेस्ट हाऊस पासून दुभाजक टाकून 75 लाखात रस्ता, सात लाखातून पेव्हर ब्लॉक, 12 लाखातून संरक्षक भिंत, नऊ लाखातून उद्यान तसेच दहा लाखातून पाण्यासह इलेक्ट्रीक फिटींग आदी कामे होणार आहेत. शिवाय भाविकांसाठी भक्त निवास, पाण्याची सुविधा यासह अनेक कामे होतील, असे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले. वरणगावच्या विकासासाठी नेहमीच पाठीशी भक्कम उभे राहणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार संजय सावकारे यांचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेंढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, शशी कोलते, राजेंद्र चौधरी, रवी सोनवणे यांनी आभार मानले आहेत.