वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरील भारनियमन बंद करा

0

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे तर कठोरा जॅकवेलवर भारनियमन वाढल्याने नागरीकांचा दुसरीकडे रोष वाढला आहे. पवित्र रमजान महिना सुरू असल्याने पाण्याअभावी मुस्लीम बांधवांचे हाल होत असून तत्काळ भारनियमन बंद न केल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंगळवार, 12 रोजी वरणगाव उपकार्यकारी अभियंता गाजरे व शाखा अभियंता कुशवा यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदन देताना भाजपाचे नेते हाजी अल्लाउद्दीन सेठ, सुनील माळी, संजयकुमार जैन, अजय पाटील, शामराव धनगर, आकाश निमकर, किशोर सोनार, गोलू राणे, नटराज चौधरी, हितेश चौधरी, संजीव सोनार, फहिम खान, विक्रांत चांदेलकर, डी.के.खाटीक, कमलाकर मराठे, नरेंद्र बावणे, छोटू सेवतकर, संजय बेदरकर, कुंदन माळी, लखन माळी, तेजस जैन, जय चांदणे, शंकर पवार, विवेक कुलकर्णी, बाळा गुजर, बंटी सोनार आदींची उपस्थिती होती.