वरणगाव। उन्हाळा सुरु झाला असून डासांच्या उत्पत्तीत वाढ़ झाली आहे. यामुळे नागरीक हैराण झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागामध्ये औषध फवारणीचा प्रारंभ करण्यात आला आहे.
यावेळी पालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा इंगळे, उपनगराध्यक्ष शेख अरवलाख, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, आरोग्य सभापती माला मेढे, नगरसेवक सुधाकर जावळे, मेहनाजबी पिंजारी, बबलू माळी, गणेश धनगर, राजेंद्र चौधरी तसेच पालिकेचे आरोग्य निरीक्षक दिपक भंगाळे, ओएस गंभीर कोळी, संजय माळी, गोकुळ भोई, सुनिल भोई, संतोष धनगर आदी नगरसेवक उपस्थित होते.