वरणगाव । शहरातील पालिकेत विषय समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण सभापतीपदी माला मिलिंद मेढे तर आरोग्य समिती सभापतीपदी नसरीनबी साजीद कुरेशी तर पाणीपुरवठा सभापतीपदी विकीन नारायण भंगाळे, बांधकाम सभापतीपदी शशी संजीव कोलते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पदाधिकार्यांचा सत्कार झाला.
या पदाधिकार्यांकडून सत्कार
सभागृहात नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार प्रांत चिंचकर, प्रभारी नगराध्यक्ष शेख अखलाक शेख यूसुफ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, भाजपा गटनेते सुनील काळे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक नितीन माळी, रोहिणी जावळे, जागृती बढे, मेहनाज बी.पिंजारी, गणेश धनगर गणेश चौधरी, वैशाली देशमुख यांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला.
यांची होती प्रसंगी उपस्थिती
निवडणूक कामकाजासाठी लिपिक माहिती व जनसंपर्क अधिकारी संजीव माळी, अधीक्षक गंभीर माळी, अभियंता डिगंबरा वाघ, राजू गायकवाड यांनी कामकाज पाहिले. भारतीय जनता पार्टीतर्फे नवनिर्वाचित सभापती यांचा सत्कार हाजी अलाउदीन सेठ, कामगार नेते मिलिंद मेढे, समाजसेवक संजीव कोलते, माजी उपसरपंच साजीद कुरेशी, भाजपा शहराध्यक्ष इफ्तेखार मिर्जा शामराव धनगर, लल्ला माळी, कौस्तुभ पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.