वरणगाव पालिकेस पीएमसी नेमण्यास मान्यता

0
उपसंचालकांनी दिली मान्यता ; नगराध्यक्षांच्या पाठपुराव्याला यश
भुसावळ : विशेष रस्ता अनुदानातून विकासकामे करण्यासाठी पालिकेत पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) नेमण्याची अट असल्याने त्यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. पाठपुराव्याला यश आले असून मंगळवार, 10 रोजी नगरपरीषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक डॉ.सुनील लहाने यांनी त्याबाबत मान्यता दिली आहे.
महाराष्ट्रातून एकमेव वरणगाव पालिकेला पीएमसी नेमण्याची मान्यता मिळाल्याचे बोलले जात आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाल्याचे नगराध्यक्ष काळे यांनी सांगत वरणगावचा निश्‍चितच लवकरच चेहरा-मोहरा आपण बदलवू, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.