वरणगाव पोलिस ठाण्याजवळील दत्ता मंदिरात गुरुदत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

0

वरणगाव- वरणगाव पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या दत्त मंदिरात दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसापासून या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा विधी वैभव जोशी, विवेक जोशी, नवदूत मुजबंदार, योगेश जोशी, निलेश मुजबदार यांच्या हस्ते करण्यात आला. या विधी प्रक्रियेत हवालदार दत्तात्रय कुलकर्णी, त्यांच्या पत्नी, युवराज चौधरी, सीमा पाटील यांनी सहभाग घेतला. या मंदिरातील आधीची मूर्ती भंग पावली असल्याने नवीन दत्त मूर्तीची स्थापना करण्यात आली. हवालदार मनोहर पाटील, अतुल कुमावत, ज्ञानदेव सपकाळे, मुकेश जाधव, गणेश शेळके, अतुल निकम, संदीप बोदडे आदींनी परीश्रम घेतले.