जगदीश परदेशी यांची बदली : सचिन सानपांनी स्वीकारली सूत्रे
वरणगाव- सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी विनंतीनंतर चाळीसगाव येथे बदली झाली ऊन त्यांच्या जागी पाचोरा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांची बदली झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. प्रसंगी वरणगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने दोन्ही अधिकार्यांचा सत्कार पोलिस ठाण्यात करण्यात आला. सहा.निरीक्षक जगदीश परदेशी यांनी एक वर्षाच्या कार्यकाळात वरणगाव परीसरात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीचे प्रमाण कमी केले होते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दडपणाखाली न येता निःपक्षपणाने व निर्भीडपणे काम करणे ही त्यांच्या कामाची पध्दत होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी धैर्याने व संयमाने जनतेला विश्वासात घेवून कायदा व सुव्यवस्था राखली होती. नवीन रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले की, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कुणाचीही गय केली जाणार नाही. अवैध धंद्यांवर अंकुश ठेवला जाईल, असे ते म्हणाले. प्रसंगी वरणगाव पत्रकार संघाचे सुरेश महाले, विनोद सुरवाडे, संतोष गौंड, अजय जैसवाल उपस्थिती होते.