वरणगाव। येथील आयुध निर्माणीच्या एसटी प्लॉन्ट विभागाजवळ 26 रोजी रात्री पट्टेदार वाघ दिसल्याने खळबळ उडाली आहे. आयुध निर्माणीतील एसटी प्लॉन्ट हा फुलगाव रोडवर आहे. या विभागाच्या भिंतीजवळ अप-डाऊन करणार्या कामगारांना 26 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाले.
त्यांनी गाडीच्या प्रकाशात पाहीले वाघ किंवा चित्ता असल्याचे शेतकर्यांचे मत आहे प्लॉन्टच्या भिंतीजवळून तो शेतात पसार झाला. या रस्त्याने दररोज 500 कर्मचारी अप-डाउन करता तसेच प्लॉन्टमध्ये 24 तास कर्मचारी काम करीत असतात. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. याबाबत वन विभाग व फॅक्टरी प्रशासनाकडून कोणताही खुलासा नाही.