भुसावळ- वरणगाव शहरातील विजया बँकेत मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास दरोडा टाकला जात असतांना पोलिसांनी नरेश सुधाकर धनगर व विक्की चौधरी या दोघांना अटक केली होती. बुधवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून बँक दरोड्यासाठी वापरलेली लोखंडी टॉमी, एक चाकु व बँकेच्या ड्रावरमधील सात हजार रूपयाची रोख रक्कम काढून दिली होती. आरोपींची शुक्रवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ यांनी अधिक तपासासाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली मात्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.