वरणगाव। आशिया महामार्गावर भरधाव वेगात येणार्या ट्रॉलाची ट्रकला जबर धडक दिल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार 21 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान आस्वाद हॉटेलसमोर घडली. ट्राला चालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धा तास वाहतूक ठप्प
ट्रकचालक पृथ्वीराज भगवी भाई खाट्यार (वय 30, राहणार गुजरात) हा वरणगावकडून ट्रक क्रमांक जीजे 3 डब्ल्यू 8719 घेवून जात असतांना समोरून येणारा ट्राला क्रमांक सीजी 04 एचटी 9961 वरील चालक हरबदनसिंग हिरासिंग (वय 58, राहणार छत्तीसगड) हा महामार्ग रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात जात असतांना समोरून येणार्या ट्रकला जबर धडक दिल्याने ट्रकचालक पृथ्वीराज खाटयार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भुसावळ तालुका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर ट्राला चालक हरबदसिंग हा दोघ गाड्यांच्या नुकसानीस कारणीभुत ठरला आहे. भुसावळ व मुक्ताईनगर महामार्गवरील अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वरणगाव पोलिस ठाण्याचे पीएसआय रफीक पठाण, वाहतूक पोलिस महेंद्र शिंगारे, गृहरक्षक दलाचे राजू फालक यांनी वाहतूक सुरळीत केली. ट्राला चालकाविरूध्द वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.