वरणगाव महाविद्यालयात एड्सविषयी मार्गदर्शन

0

वरणगाव। येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व आयसीटीसी विभाग ग्रामीण रूग्णालय वरणगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने एड्स आजाराविषयी जनजागृती रेडरिबन क्लब आणि एचआयव्ही तपासणी याबद्दल विद्यार्थांना मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी समुपदेशिका ज्योती गुरव म्हणाल्या की, आजपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना ट्रिट ऑल याविषयी सखोल माहिती दिली. विघ्यार्थीना शपथ देण्यात आली व लग्न ठरवितांना कुंडली जोडण्यापेक्षा एचआयव्ही एड्स तपासणी करणे गरजेचे आहे. हा मोलाचा सल्ला दिला.

विद्यालयात एचआयव्ही तपासणी
विद्यालयातील 50 विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी एचआयव्ही तपासणी केली. महाविद्यालयात रेड रिबन क्लब स्थापन करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी.बी.देशमुख, उपप्राचार्य के.बी.पाटील, प्रा. अनिल धांडे, संध्या निकम, भावना प्रजापती आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. अशोक चित्ते यांनी मानले.