वरणगाव महाविद्यालयात रक्तदान शिबीर

0

वरणगाव । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे महोत्सवा निमित्त येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे रक्तदान शिबीर सकाळी 10 वाजता घेण्यात आले. शिबीरात 25 स्वयसेवकांनी रक्तदान केले.

यावेळी गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, रोटरी क्लब, वैद्यराज ब्रम्हराज शर्मा रक्तपेढी, डॉ. अभिषेक वडगावकर, डॉ. ठाकूर, रितेश वारके, लक्ष्मण पाटील, हिरामण लांडगे, अंकिता गवई, रश्मी इंगळे आंदीचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अंनतराज पाटील, उपप्राचार्य के.बी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल शिंदे, सहाय्यक महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. वृक्षाली जोशी, संध्या निकम, प्रा. दिनू पाटील, प्रा. अशोक चित्ते, प्रा. राहुल संदाशिव, प्रा. बी.बी. पाटील, प्रा. ए.जी. काटकर, प्रा. अविनाश बडगुजर, प्रा. बी.जी. देशमुख, प्रा. अजीत कलवले आदी प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्योनी परिश्रम घेतले.