वरणगाव येथे नगरसेविकेवर कारवाईचा बडगा !

0

वरणगाव। नगरसेविका जागृती बढे यांचे पती सुनिल बढे यांनी 2 व 9 मे रोजी नगरपरीषद कार्यालयात येवुन मुख्यधिकारी, कर्मचारी यांना उपमर्द पध्दतीची वागणुक तसेच अर्वाच्च भाषा वापरुन अवमान करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून नगरविकास मंत्रालयच्या निकषानुसार जागृती बढे यांच्यावर कार्यवाहीचा बडगा म्हणुन मुख्यधिकार्‍यांकडून नोटीस देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका जागृती सुनिल बढे यांनी त्यांच्या प्रभागातील गेल्या दोन वर्षापासुन मंजुर असलेली कामे होत नसल्याने नगर परिषदेच्या 2 मे च्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकुन सभात्याग केला होता.

पाणी पुरवठ्यांवरुन झाला वाद
वरणगाव नगरपरीषदेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना जाण्यास परवानगी नसल्याने जागृती बढे यांनी सभागृहाच्या बाहेर उभ्या असलेल्या आमच्या प्रतिनिधीशी भेटून सांगितले होते की, प्रभाग क्रमांक 1 मधील गटांरी, रस्ते, महीला – पुरुष शौचालय, नळ कनेक्शन आदी कामे गेल्या दोन वर्षापासुन मंजुर असुन सुध्दा कामे होत नाही त्यामुळे सभात्याग केला. असे सांगुन जागृती बढे व सुनिल बढे हे नगरपरिषद कार्यालयातुन निघुन गेल्या होत्या. आठ दिवस होवुनही कोणत्याच कामाची सुरवात नाही. उलट पक्षी वॉर्डातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी 9 मे रोजी वार्डातील महीला व पुरुषांचा मोर्चा घेवुन नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन केले व पाणी वेळेवर का सोडत नाही, पाण्याची गळती का थांबवली जात नाही. आदी प्रश्न वार्डातील नागरीक व त्याच्या बरोबर आलेली नगरसेविका विचारू लागले.

सदर वार्डातील रहीवाशी सुनील बढे हेही असल्याने त्यांनाही या समस्सेला सामोरे जावे लागत आहे म्हणून तेही या मोर्चात स्वामील होवुन त्याठिकाणी उपस्थित आधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारला होता. तर नगरपरिषदेत जावुन शासकीय कामात ढवळाढवळ करुण कर्मचार्‍यांशी वाद घातला व त्याच्या वैय्यक्तीक संबधीत नसलेल्या कामाचा आग्रह धरूण कर्मचार्‍यांना वेठीस धरले व सदर कामावर विशिष्ठ पध्दतीने कार्यवाही व्हावी असा दबाव आणला म्हणून जागृती बढे यांना कार्यवाहीसाठी नोटीस पाठवली जाते. मग वरणगांव नगरपरीषद मध्ये अन्य काही नगसेविकांचे पतीही कर्मचार्‍यांना काम सांगणे, कामाच्या यादया बघणे , ठेकेदाराला वार्डातील काम सांगणे आदी कामात ढवळाढवळ करतांना अनेक वेळा दिसत असतात, त्यांच्यावर कार्यवाही का नाही ? अशी ही चर्चा वरणगांव शहरात सुरु आहे.