वरणगाव येथे बहुजन क्रांती मोर्चाची बैठक

0

वरणगाव : विविध मागण्यासंदर्भात 11 रोजी निघणार्‍या बहुजन क्रांती मोर्चाची नियोजन बैठक येथील विश्रामगृहात बहुजन समाज बांधवाच्या उपस्थित बैठक संपन्न झाली. जिल्हाभरातील विविध राजकीय व सामाजीक संघटनांच्या माध्यमातून जळगाव शहरामध्ये मराठा, कुणबी, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, डिएनटी, व्हीजेएनटी, एसबीसी, एमबीसी, अल्पसंख्याक मुस्लिस, जैन, लिंगायत, शिख, बुध्दिस्ट, ख्रिश्चन, शिवधर्मीय अशा बारा बलूतेदार बहुजनांचा येत्या बुधवार 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त बहुजनांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियोजन करण्यात आले.

विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केले मार्गदर्शन
या बैठकीत रिपाइं जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी, उपजिल्हाध्यक्ष रुपेश मेढे, पालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा इंगळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, आरोग्य सभापती माला मेढे, नगरसेवक सुनिल काळे, बबलू माळी, साजीद कुरेशी, सामाजिक कार्यकता मिलींद मेढे, इरफान पिंजारी, उल्हास भारसके, सुधीर वाघोदे, राजु सुरवाडे, शामराव इंगळे, संजय भैसे, किशोर तायडे, राहुल इंगळे, प्रकाश इंगळे, सुनील जोहरे आदी विविध बहुजन संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचालन अजय इंगळे यांनी केले.