वरणगाव । येथील रंगाटी गल्ली जिल्हा परिषद शाळेसमोर नगरपालिकेने 2010 मध्ये मयत झालेल्या वक्तीच्या नावावर 2015 मध्ये नळ कनेक्शन दिल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे. येथील भोगावती नदीजवळील विजय एकनाथ बोदडे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना या घटनेची तक्रार केली आहे. वरणगाव येथील मयत गोविंदा कृष्णा बोंडे, रंगाटी गल्ली, जिल्हा परिषद शाळेसमोर यांच्या नावाने 2015 मध्ये खोट्या सहीचा अर्ज माहितीत दिसत आहे. या अर्जानुसार मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी कनेक्शन मंजुर करून मुकतार खान अजिज खान व निलेश झांबरे या कर्मचार्यांनी ही जोडणी केली आहे. या प्रकरणात बोगस कागदपत्रांचा आधार घेवून कसलीही चौकशी न करता हे कनेक्शन देण्यात आले आहे. सदर व्यक्ती मयत असतांना हे त्यांच्या नावाचा अर्ज कोणी केला. हे चारूलता संजय बोंडे यांच्या नावावर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी बोदडे यांनी केली आहे. अन्यथा उपोषणाचा इशारादेखील देण्यात आला आहे.