वरणगाव येथे 8 रोजी बहुजन क्रांती मोर्चा नियोजन बैठक

0

वरणगाव : बहुजन क्रांती एकता मेळाव्यानिमित्त 11 रोजी जिल्ह्यातील बहुजन समाजबांधव एकत्र येणार आहे. भव्य मोर्चाची बैठक रविवार 8 रोजी सायंकाळी 5 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी वरणगाव शहरातील विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मोर्चा संदर्भाविषयी व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून शासनाची जलदगती न्यायालय स्थापन करावे. या केसेस तात्काळ निकाली संदर्भात मागण्या मांडण्यात येणार असून याबाबत उपस्थित सर्व पक्ष व संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये विचारविनिमय करण्यात येणार आहे. तरी सर्व समाजबांधवांनी या बैठकीत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लीकन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रूपेश मेढे यांनी केले आहे. या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, कॉन्स्ट्राईब संघटना नाशिक विभागाचे मिलींद मेढे उपस्थित राहणार आहे.