वरणगाव : वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भाजपा कार्यालयात मानाच्या गणपतीची विधीवत स्थापना केली. यावेळी आध्यत्मिक आघाडीचे रमेश मामा बैरागी व हरीद्वारचे महाराज यांच्या उपस्थितीत मानाच्या गणपतीची स्थाना करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी कारोना काळात वरणगावकरांची विस्कटलेली घडी पुन्हा पूर्ववत बसू दे व वरणगावकरांना सुखी समाधानी व आनंदी ठेवून शहर विकासाच्या बाबतीत राज्यात क्रमांक एकचे वरणगाव शहर होऊ दे, असे गणरायाला साकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी साकडे घातले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, राहुल जंजाळे, कमलाकर मामा मराठे, पप्पू ठाकरे, विनोद बावणे, हरीद्वारचे महाराज उपस्थित होते. यावेळी मूर्तिकार तनिष्क भैसे यांनी स्वतःच्या हाताने मानाच्या गणपतीची मातीची मूर्ती बनविली. या मूर्तीची स्थापना यावेळी करण्यात आली. प्रेम व आदेश यांनी पहाड प्रतिकृती तयार करून त्यात श्री गणरायाची स्थापना आई, वडील व पत्नी यांच्या उपस्थितीत केली.