वरणगाव विकासोत शेतकरी विकास पॅनल विजयी

0

वरणगाव । येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत 2 उमेदवार विनविरोध निवडून आले आहे. तर उर्वरीत 11 संचालक मंडळासाठी 15 उमेदवार रिंगणात होते. यात शेतकरी विकास पॅनल बहुमतांनी विजयी झाले आहे.विविध कार्यकारी सोसायटीची निवडूक रविवार 7 रोजी सकाळी 8 वाजेला मतदान जिल्हा परिषद मराठी शाळेत घेण्यात आले. तर सांयकाळी 5 वाजता निकाल जाहिर करण्यात आला. या निवडणूकीत 1 हजार 300 मतदारांपैकी एकुण 721 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

निवडणुकीत यांना मिळाला विजय
शेतकरी पॅनलचे उमेदवार कैलास माळी, संभाजी देशमुख, महारु धनगर, जितेद्र चौधरी, प्रदिप भंगाळे, अनिल वंजारी, गणेश कोलते, चंद्रशेखर झोपे, सुरेखा चौधरी, रजनी जावळे, किशोर भंगाळे हे उमेदवार विजयी झाले आहे. निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी एस.जी. दराडे यांनी काम पाहिले.