वरणगाव। गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असूनही वरणगाव शहरातील पालिकेंतर्गत कामे सोडल्यास एकही कामे पूर्णत्वात केले नसल्याने वरणगावच्या जनतेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.विधानसभा, लोकसभा व पालिका निवडणुकीत प्रचाराप्रसंगी सत्ताधारी पक्षाने वरणगावकरांना अनेक विकास कामांचे आश्वासन दिले होते. परंतू अद्यापही विकास कामांची पुर्तता करण्यास पक्ष अपयशी ठरत आहे. मग शहराचे दुर्दैव सत्ताधार्यांनाच विकासाठी आंदोलन करण्याची वेळ येते. मात्र विरोधकांना सत्तेत असल्याचा भास होत आहे. सत्तेच्या विरोधात विरोध करत नाही. यावरुन सिद्ध होते. सत्ताधार्यांची वरिष्ठ नेत्यांकडे येथील पुढार्यांची किंमत किती आहे. या अर्धवट विकासातून सिध्द होत आहे.
प्रलंबित कामांना गती मिळणार का?
येथील पुढार्यांनी विकासकामाचा बट्याबोळ केला असून शहरातील बरेच दिवसापासून बसस्थानकाचा प्रश्न, रेल्वे थांबा, ओव्हर रेल्वे ब्रिज, नागरिकांच्या घरावरुन गेलेली 33 केव्ही विज, शहरातील पाणी पुरवठा ठिकाणी एक्सप्रेस फिडर, महामार्गावरील सर्व्हिस रस्ते, ग्रामीण रुग्णालयाचा तिसर्या टप्प्याचे अर्धवट बांधकाम व रुग्णालयातील डॉक्टरासह कर्मचार्यांची रिक्त पदे असे अनेक व विविध अपूर्ण व प्रलंबित कामे अद्यापही पूर्ण झालेले नाही.
प्रसिध्दीसाठी पुढार्यांकडून केली जाते पत्रकबाजी
या कामांच्या नावावर नागरींकाची दिशाभूल करुन प्रसिध्दीच्या झोतात पत्रकबाजी राजकीय पुढार्यांकडून केली जाते. मात्र आमदार, खासदार वरणगाव शहरात आल्यानंतर या विकास कामाबाबत कोणताही पुढारी बोलायला तयार नसून आपली खाजगी कामे सांगुन पूर्ण करतात. मात्र सत्ता असतांना प्रलंबित असलेली कामे पूर्ण का? होत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मात्र पत्रक छाप पुढार्याच्या स्वप्नातील विकासकामे पूर्ण होतील का, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.