वरणगाव शहरातील वीज बिल वसुलीचे उद्दीष्ट साध्य करणार

0

वरणगाव। शहरात घरगुती, औद्योगीक व वाणिज्य असे एकूण ग्राहक संख्या 5 हजार 500 एवढी असून त्यांचे कडील थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने वीज वितरण जिल्हा कार्यकारिणीच्या आदेशावरून शहरातील थकबाकीची रक्कम पूर्ण करण्याचे आव्हान येथील अभियंता व्ही.बी. सिंग यांच्याकडून उद्दीष्ट पूर्ण होत असल्याचे दिसून येत आहे.

100 टक्के वसुली करण्याचे दिले आश्‍वासन
वरणगाव येथे कट ऑफ डेट 28 फेब्रुवारी 2017 नूसार 5 हजार 500 ग्राहकांपैकी 1 हजार 260 ग्राहक थकबाकीदार आहेत त्यांचेकडून उद्दीष्ट पूर्ण करत वीजग्राहकांची थकबाकी (100 रुपयांच्यावर) 14.38 लाख आहे. शिल्लक असलेल्या थकबाकीचे 100 टक्के पूर्ण करण्याचे आश्वासन अभियंता व्ही.बी. सिंग यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या वीज वितरण विभागाकडे दिले आहेत. थकबाकीची वसुलीकरीता विविध युक्त्या लढवून वसुली केली जात असून ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी रक्कम न भरल्यास अशा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कायम खंडीत करण्याच्या सूचना नोटीसच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत.

न्यायालयामार्फत करण्यात येणार वसुली
थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे व पुन्हा त्याच ग्राहकाने नविन वीज पुरवठ्याकरीता मागणी केल्यास त्याला मागील थकबाकी व सुरक्षा ठेव निधीची रक्कम भरल्यावर नविन जोडणी करता येईल. काही ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून थकबाकी संदर्भात नोटीस दिल्या आहेत आणि त्यांनी दिलेल्या तारखेच्या आत थकबाकी असतांना न भरल्यास न्यायालयामार्फत वसुली करण्यात येणार आहे.

वंडी स्वरूपात सूचना
मागील वर्षी 2016 ची थकबाकी 4 लाख 50 हजार होती. आज रोजी त्या थकबाकीची रक्कम तीन पट (13 लाख 50 हजार) झाली असून या रकमेचे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट जिल्हा पातळीवरून सहाय्यक अभियंता व्ही.बी. सिंग यांचेकडे सोपविण्यात आले आहे. वरणगाव येथील वीज वितरण कार्यालयामार्फत ग्राहकांना प्रोत्साहीत करण्याकरीता दवंडी स्वरूपात सूचना देण्यात येत आहेत तर थकबाकी वसूली करीता विविध उपाययोजना राबविल्या जात असून वसूलीसंदर्भात वरणगाव वितरण कार्यालयामार्फत सहाय्यक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली एस.झेड. धनगर, डी.पी. भिरूड, जी.सी. महाजन, एम.सी. पाटील, एन.एस. बाविस्कर, संदीप पाटील, निलेश बेंडाळे, अरूण इंगळे, अमीर खान, मयूर धांडे, धर्मेंद्रसिंग रावळ आदी तर ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की, थकबाकी त्वरीत भरून कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.