वरणगाव शहरात गाळमिश्रीत पाणीपुरवठा

0

वरणगाव। गेल्या तीन ते चार दिवसापासून दमदार पाऊस झाल्याने हतनुर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच पुरामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ देखील आहे. यामुळे जलशुद्दीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गाळमिश्रीत पाण्याचा पुरठा होत आहे. यामुळे शहरात गाळ मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत आहे.

पालिकेने गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता
नदीला पुर आल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ मिश्रीत पाण्याचा पुरवठा जॅकवेल वरुन जलशुध्दीकरण केंद्रावर होत आहे. यामुळे येथील जलशुध्दीकरण केंद्रावर पुरेशा प्रमाणात टीसीएल पावडर व शुध्दीकरण यंत्रणा वापरल्यावर देखील पुरेशा प्रमाणात पाणी शुध्द होत नाही. यामुळे हे पाणी शहरात पुरवले जात आहे. शहरातीन नागरीक पाण्यात तुरटी फिरवून पाण्याचा वापर करीत आहे. मात्र यामुळे विविध साथीच्या आजारांच्या रुग्णात वाढ झाली आहे. यामुळे पालीकेने याकडे गांभिर्यीने लक्ष देवून पाण्याच्या शुध्दीकरणावर लक्ष दिले पाहिजे. जेणेकरुन शहरातील नागरीकांचे धोक्यात येणार नाही.

नदीला पुर आल्यामुळे पाण्याची पातळी वाढली असुन गाळाचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र जलशुध्दीकरण केंद्रावर पुरेशी काळजी घेवून शुध्द पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गाळमिश्रीत पाण्याचा पुरवठा झाला असेल तर खबरदारी घेण्याच्या सुचना कर्मचार्‍यांना दिल्या जातील.
प्रशांत सरोदे,
मुख्याधिकारी