वरणगाव शहरात दारुबंदी करण्यासाठी महिलांचा एल्गार

0

वरणगाव। सिध्देश्वरनगरातील महिलांनी अवैध दारूबंदी व जुगारबंदी करण्यासाठी वरणगाव पोलिस ठाण्यात मोर्चा आणला होता. सुमारे दोनशेच्यावर महिला व पुरुषांनी पोलिस ठाण्याचे अधिकारी जगदीश परदेशी यांना निवेदन देण्यात आले. मात्र मोर्चातील महिलांनी अवैध दारु, सट्टा, पत्ता, जुगार बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. याप्रसंगी अधिकारी यांनी दारूबंदीचे आश्वासन दिले.

कारवाई करण्याचे दिले आश्‍वासन
गेल्या काही दिवसापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील व राज्य महामार्गावरील सर्वच मद्यविक्रीचे दुकाने 500 मिटरच्या आत बंदी असल्याने कारवाईच्या भितीने शहरात बर्‍याच ठिकाणी चोरुन लपुन हातभट्टी, बनावट दारु, देशी विदेशी सर्रास मद्यविक्री वरणगाव शहरासह परिसरात विक्री होत आहे. त्यातील सिध्देश्वरनगर परिसरात मजूर वर्ग अधिक असून त्या ठिकाणी अवैध दारु विक्रीचे दुकाने असल्याने मजूर वर्गातील नागरिक दारु पिवून रहिवाशांना विनाकारण शिवीगाळ करणे भांडण तट्यांचे कुरापती करणे असे विषय वारंवार होत असतात. त्यामुळे दिवसभराची कमाई दारुत खर्ची घातली जात असल्यामुळे गोरगरीब मजुरांचे कुटूंब उघड्यावर पडत आहे. तसेच येथील अवैध धंदेवाईकांची मुजोरी देखील दिवसेंदिवस वाढतच चालली असून या सर्व विषयांना महिला कंटाळून गुरुवार 22 रोजी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक परदेशी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, येथे शांततेचा भंग असभ्यता अस्वस्था व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शोभा तायडे, जितू निकम, संजय सोनवणे, अमोल इंगळे, गणेश माळी, रघु माळी हे अवैधरित्या दारुविक्री करीत असून यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संतप्त महिलांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. याप्रसंगी महिलांनी आश्‍वासन मिळे पर्यंत पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन केले. शंभरच्यावर महिला व तरुण मुलांनी पोलिस स्टेशनचे अधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावर कारवाई करण्याचे आश्‍वासन पोलीसांतर्फे देण्यात आले आहे.