वरणगाव शहर विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रस्थानी

0

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर ; वर्षपूर्तीनिमित्त पालिकेला जेसीबी लोकार्पण

वरणगाव- वरणगाव पालिकेच्या वर्षपूर्तीनिमित्त जेसीबीचे लोकार्पण जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकार्‍यांचा सत्कार नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शाल, श्रीफळ देवून व फेटा बांधून केला. सत्काराला उत्तरदेताना किशोरराजे निंबाळकर म्हणाले की, वरणगाव शहर विकासकामांमध्ये अग्रेसर असून विकासासाठी जो निधी कमी पडेल तो आपण पालकमंत्र्यांच्या संमतीने देणार असून प्रशासकीय इमारतीचा प्रश्‍न दोन दिवसात मार्गी लावू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

वरणगावात 14 कोटींची विकासकामे -नगराध्यक्ष
प्रास्तविक नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले. ते म्हणाले की, वर्षपूर्ती कार्यक्रमास जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या उपस्थितीत मनस्वी आनंद झाला असून आतापर्यंत शहरात 14 कोटींची विकासकामे पूर्ण झाली आहेत. भोगावती नदीखोलीकरण तसेच नगरपालिका ईमारतीसाठी जिल्हाधिकार्‍यांनी सहकार्याची ग्वाही दिली असून त्यासाठी आपण शहरवासीयांच्या वतीने त्यांचे आभार मानत असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, नगरसेवक माला मेढे, नगरसेवसक राजेंद्र चौधरी, अरुणा इंगळे, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, रोहिणी जावळे, जागृती बढे, गणेश चौधरी, सुधाकर जावळे, ईरफान पिंजारी, संजीव कोलते, साजीद कुरेशी, अल्लाउद्दन सेठ, पप्पू जकातदार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.