वरणगाव। तालुक्यातील वरणगाव येथील शासकीय विश्रामगृह परिसरात मोठ्या प्रमाणावर काटेरी झाडे-झुडपे वाढली असून वापराअभावी याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.
येथील आयुध निर्माणी प्रकल्पाचे काम सुरु होण्याअगोदर वरिष्ठ अधिकार्यांचा नेहमी येथे राबता असल्याकारणाने रेल्वे स्थानकाजवळ 1964 मध्ये शासकीय विश्रामगृहाची उभारणी करण्यात आली. मात्र सध्या याचा वापरच होत नसल्यामुळे विश्रामगृहाची दुरावस्था झाली असून देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.