वरणगाव शिवारात आढळला बिबट्याचा मृतदेह

0

वरणगाव – वरणगाव शिवारातील एका नाल्याकाठी बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याचा मृत्यू झाला की त्याची शिकार केली याबाबत परीसरातून वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात येत आहे. दरम्यान वनविभागाला या घटनेची माहिती मिळाल्याने घटनास्थळी धाव घेतली आहे. मयत बिबट्या मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती शवविच्छेदनानंतरच करता येईल अशी माहिती वनविभागाने दिल आहे.