वरणगाव। वरणगाव शहरात विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे करण्यात आलेली आहेत. यापुढेही अशीच विकास कामे केली जातील. त्यामुळे शहराची मॉडेल सिटीकडे वाटचाल सुरु असून येणार्या पाच वर्षाच्या कालखंडात वरणगाव शहर सुंदर शहर होणार असल्याचे प्रतिपादन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. वरणगाव नगरपरिषदतर्फे आयोजीत अल्पसंख्यांक बहुल विकास योजनेअंतर्गत वॉर्ड क्रंमाक 3 इमलीवाडा 20 लाख रुपयाचे विवाह सभागृह, वॉर्ड क्रमांक 7 व 8 मध्ये 40लाख रुपयाचे सभागृह व वॉर्ड क्रंमाक 15 प्रतिभा नगर येथे 20 लाखाचे पेव्हर ब्लॉक व क्रॉक्रेटीकरण कामांचे भुमीपुजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार खडसे बोलत होते. यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, अल्पसंख्याक आयोगचे मोहंमद हुसेन, भुसावळचे नगरध्यक्ष रमण भोळे, वरणगाव नगराध्यक्षा अरुणा इंगळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, अख्तर पिंजारी, मुन्ना तेली, इरफान शेख, सईद बागवान, हाजी अलाउद्दीन, हाजी मकसुद अली, गोगासेठ, शकिल, माजी उपसभापती गोलू पाटील, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, गटनेते सुनिल काळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार एकनाथाराव खडसे म्हणाले की, येणार्या पाच वर्षाच्या कालखंडात वरणगाव शहर सुंदर शहर म्हणून ओळखले जाणार आहे. भोगावती नदीचे खोलीकरणासाठी निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार खडसेंनी स्पष्ट केले.
आरोपांमुळे काहीच फरक पडणार नाही
शहरातील नागरीकांनी विकासाच्या दृष्टीकोणातून मतदान केले आहे. मी गोड नसून मी विकासकामे गोड आहे. भोसरी जमीन खरेदीप्रकरणी कोणीही कितीही आरोप केले तरी मला काहिच फरक पडणार नसल्याचे खडसेंनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी सार्वजनीक बांधकाम सभापती विकीन भंगाळे, पाणी पुरवठा सभापती बबलू माळी, माहिला बालकल्याण सभापती मेहनाजबी पिंजारी, आरोग्य सभापती माला मेढे, नगरसेविका जागृती बढे, रोहीणी जावळे, नसरीन बी साजीद कुरेशी, वैशाली देशमुख, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, नगरसेवक गणेश धनगर, विनोद चौधरी, राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, रविंद्र चौधरी, विष्णू खोले, भुसावळ तालूका अल्पसंख्यांक अध्यक्ष शेख सईंद शेख भिकारी, शहराध्यक्ष इफ्तेखार मिर्जा, कामगार नेते मिलींद मेढे, इरफान हारुन पिंजारी, साजीद शेख इमाम कुरेशी, राजेश इंगळे, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शफी यांनी केले. तर आभार शेख सईद यांनी मानले.
13 कोटींची विकासकामे
तसेच माझ्या सोबत सर्वसामान्य जनता आहे आणि कोणीही आरोप केले तरी पुरावे नाहीत. हे केवळ मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. आणि ते हाणून पाडणार तसेच वरणगाव नगरपालिकेला मुख्याधिकारी प्रशांत सरोदे हे चांगले अधिकारी मिळाले आहे. शहरात विकासाची भर पडत आहे. दोन वर्षात पालिकेच्या माध्यमातून 13 कोटीच्या वर विकासकामे झाली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले.