वराडला जुन्या वादातून दोन गड भिडले

धरणगाव : जुन्या भांडणातून वराड गावात दोन गट भिडल्यानंतर झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर कुर्‍हाडीने वार केल्याप्रकरणी दोन्ही गटातील तब्बल 19 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जुना वाद पुन्हा उद्भवला
वराड गावातील तुषार भगवान पाटील व सोमनाथ भरत पाटील यांच्या गटात अनेक दिवसांपासून वाद आहेत. याच वादाची ठिणगी शनिवार, 13 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पडली. किरकोळ कारणावरून दोन्ही गट एकमेकांच्या समोर आले. यावेळी तुषार पाटील यांच्यावर टीकाराम पाटील, मयूर पाटील, राजू पाटील, सोमनाथ पाटील, सागर पाटील, प्रशांत पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, सागर अशोक पाटील, नागराज पाटील, देविदास पाटील व मोरेश्वर पाटील यांनी हल्ला चढवला. प्रत्युत्तरात सोमनाथ पाटील यांच्या गटावर तुषार पाटील, किरण वाल्डे, भिकन पाटील, चेतन पाटील, रितेश पाटील, पंडीत पाटील व ज्ञानेश्वर पाटील यांनीही हल्ला केला.

लाठ्या-काठ्या कुर्‍हाडींचा वापर
दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या काठ्या, कुन्हाडीने वार केले. दोन्ही गटातील चार ते पाच जण गंभीर जखमी झाले होते. गावकर्‍यांनी हे भांडण सोडवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर तुषार पाटील व सोमनाथ पाटील यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यानुसार दोन्ही गटातील 19 लोकावर दंगलीचा गुन्हा धरणगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार हिरालाल पाटील आणि हवालदार अरुण निकुंभ करीत आहेत.