वरिष्ठ निरीक्षक वाघमोडे यांना प्रतिष्ठेचा”स्क्रोल ऑफ हॉनर” पुरस्कार

0

निगडी : नूतन सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालायमध्ये निगडी पोलिसांनी अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले. मग तो अत्याधुनिक सायकल चोरी असो की उबेर कार चोरी प्रकरण, यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांची भूमिका महत्त्वाची होती.

निरीक्षक वाघमोडे यांनी या पूर्वी तत्कालीन पुणे ग्रामीण पोलीस मध्ये लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. देहूरोड, तळेगाव, रांजणगाव तसेच लोणावळा पोलीस ठाण्यात उत्तम कामगिरी बजावली आहे. त्या प्रशंसनीय व उत्तम कार्याची दखल घेत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती (महाराष्ट्र राज्य) तसेच जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचा “स्क्रोल ऑफ हॉनर” हा पुरस्कार नुकताच निगडी येथे प्रदान करण्यात आला. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला अध्यक्ष अर्चना घाळी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सुनिल शहा, पत्रकार रोहित आठवले, उपाध्यक्ष पंकज गुगळे, सेक्रेटरी अतुल धोका,अनुप शहा, कमलेश चोपडा,संतोष छाजेड, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, बळीराम शेवते, विजय जगताप हे प्रमुख उपस्थित होते.

या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले,”नागरिकांच्या वतीने पोलिसांच्या कामगिरीचा अभ्यास करून देण्यात येणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नक्कीच स्फूर्ती देणारा ठरला आहे.यामुळे नागरी सेवा सुदृढ करण्यासाची पोलीस यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे. भविष्यात निगडी विभागातील गुन्हेगारी आलेख कमी करण्यासाठी आमचे कर्मचारी कार्यरत असतील.”सदर पुरस्कार समितीमध्ये विधितज्ज्ञ सदस्य तसेच लोकअदालत सदस्य अ‍ॅड.लक्ष्मण उमरगे, सामाजिक कार्यकर्त्या कुसुम भंडारी,मनोहर दिवाण यांनी काम पाहिले.