वरिष्ठ सहाय्यकास लाच घेतांना अटक

0

धुळे। धुळे तालुक्यातील देवपुर येथील एकविरा देवी मंदिराजवळ असलेल्या बखळ प्लॉटवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी पैश्याची मागणी करणारे वरिष्ठ सहायक अतिरिक्त कार्यभार विभाग प्रमुख,अतिक्रमण विभाग धुळे नंदुलाल शामराव बैसाणे व खाजगी इसमास यांना 10 हजार रूपयाची लाच घेतांना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी पकडले.

देवपूर येथील बखळ प्लॉटचे अतिक्रमण काढण्यासाठी तक्रारदार याने अर्ज दिला असता त्याला नंदुलाल बैसाणे यांनी 25 हजाराची लाच मागितली.त्यावेळी अतिक्रमण काढण्यासाठी 10 हजार रूपये दिले. पैसे दिल्यावरही अतिक्रमण न काढल्यामुळे तक्रारदार यानी नंदुलाल बैसाणे यांनी धुळे मनपात जावून भेट घेवून अतिक्रमण काढण्याबाबत विचारणा केली असता. उर्वरित15 हजार रूपयाची मागणी केली. याबाबत धुळे लाचलुजपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. तक्रारदार यांनी तडजोडी अंती 10 हजार रूपये देण्याचे ठरले.

रंगेहाथ पकडण्यात आले
बैसाणे याच्या सांगण्यावरून खाजगी इसम दादाभाई मोहिते यांनी 10 हजार रूपये स्विकारतांना रंगेहाथ पकडले. ते पैसे मोहिते यांनी बैसाणे यांना देतांना रंगेहाथ पकडण्यात आले. डिवायएसपी शत्रुघ्न माळी, पोनि महेश भोरटेकर, पवन देसले, जितेद्र परदेशी ,किरण साळी, संदीप सरग, देवेद्र वेन्दे,कृष्णकांत वाडीले, संतोष हिरे, कैलास शिरसाठ, कैलास जोहरे, मनोहर ठाकुर, प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी,संदिप कदम हे होते.