चाळीसगाव । पुणे येथील रांजणगाव परीसरात असलेल्या एटीएमच्या कंपनी काम करणार्या 28 वर्षीय सुपयवाझरने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून धावत्या मालगाडी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. मयताच्या खिश्यातून निघालेल्या चिठ्ठीत लिहिलेल्या मजकूरावरून नगरदेवळा येथील रहिवाशी असून पुण्याला कामा होता. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगरदेवळा येथील रहिवासी योगेश विजयसिंग परदेशी (वय-28) हे गेल्या काही वर्षापासून पुण्याजवळी रांजणगाव येथे असलेल्या safegard Writer एटीएम बनविणार्या कंपनी कामाला होता. सदरील कंपनी एटीएम बनविण्याचा ठेका घेत असून त्याठिकाणी सुपरवाइझरचे काम करत होते. त्यांचे सहकारी दोन सुपरवाइझर आणि दोन व्यवस्थापक यांच्या जांचाला कटाळून तो गावी परत आला होता. आपण वरीष्ठांच्या जांचा कटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहून 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चाळीसगाव रेल्वेस्टेशन जवळील नारायण वाडी व पंचशिल नगरच्यामध्ये असलेल्या रेल्वे टॉवर जवळ भुसावळकडून मुंबईकडे भरधाव जाणार्या मालवाहू रेल्वे समोर उभा राहून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताचा पोलिसांनी घटनास्थळी एकच धाव घेतली.