धुळे । आ.अनिल गोटे यांनी गुड्डया उर्फ रफियोद्दीन शेख याच्या हत्याकांडाप्रकरणी चौकशीसंदर्भात मागणी करणारे एक पत्र विशेष पोलिस महासंचालक यांना दिले आहे. या पत्रातून त्यांनी मयत गुंड गुड्डयाने कोपरगाव न्यायालयात धुळ्यातील वरीष्ठ पोलिस अधिकार्याविरुध्द पुर्वी केलेल्या एका लेखी तक्राराची माहिती देत प्रसिध्द झालेल्या काही बाबीचा उल्लेख करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे. गुड्डया खून प्रकरणी आ. गोटे यांनी मुंबई क्राईम ब्रांचकडे तपास सोपवण्यासाठी पाठपुरावा केला असून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यापुर्वी लेखी निवेदन दिले आहे.
हत्याकांडाची माहिती दिली
या पत्रकात आ.गोटे यांनी गुंड गुड्डयाच्या हत्याकांडासंदर्भात प्रसिध्द झालेल्या काही घटनाक्रमांच्या बाबीची माहिती आपण विशेष महासंचालकांना दिली असल्याचा दावा केला आहे.तसेच या अनुषंगाने गुड्डया खून प्रकरणाच्या चौकशीसाठी सदर माहितीचा उपयोग करावा आणि चौकशी करावी अशी मागणी आ.अनिल गोटे यांनी केली आहे. तसेच मयत गुंड गुड्डया याने पुर्वी कोरपगाव तुरुगांत असतांना कोपरगाव न्यायालयासमोर दिलेल्या एक अर्जाची माहिती देखील आ.गोटे यांनी या पत्रकात नमुद केली आहे.
महत्त्वाची कागदपत्रे सादर
तसेच त्यांच्या मागणीनुसार या खून प्रकरणाच्या तपासासाठी गृहविभागाने एक एसआयटी देखील स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, आज 14 ऑगस्ट आ.अनिल गोटे यांनी एक पत्रक प्रसिध्दीस दिले असून विशेषपोलिस महासंचालक, नाशिक यांना आपण लेखी माहिती आणि महत्वाची कागदपत्रे देत त्याचीही चौकशी करावी अशी मागणी केली असल्याचा दावा आ.गोटे यांनी या पत्रकातून केला आहे.
पोलीस अधिकार्याविरूद्ध गुड्ड्याचा अर्ज
या तक्रार अर्जातून मयत गुंड गुड्डयायाने धुळ्यातील एका वरिष्ट पोलिस अधिकार्याचा उल्लेख करुन त्यांच्यापासून आपल्या जिवीतास धोका असून संरक्षणाची मागणी केली होती. असाही उल्लेख यात आहे. धुळे पोलिस दलातील एकाच पोलिस अधिकार्याविरुध्द गुड्डयाने केलेला हा अर्ज देखील सदर खून प्रकरणातील चौकशीसंदर्भात विचारात घेण्याची मागणी या अनुषंगाने केली असल्याचेही आ.गोटे यांच्याकडून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.