वरुड येथे मका ज्वारी बाजरी खरेदी केंद्राचा आ देवेंद्र भुयार यांच्या हस्ते शुभारंभ !

मका ज्वारी बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा !

वरुड – तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुक्यातील शेकऱ्यांसाठी शासनाच्या किमान आधारभूत किंमतीत एफएक्यु ( FAQ ) दर्जाची मका , ज्वारी, बाजरी खरेदीचा शुभारंभ मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाला .
      कृषी उत्पन्न बाजार समिती  येथे मका, ज्वारी, बाजरी खरेदीचा शुभारंभाला आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळु पाटील कोहळे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबाराव बहुरूपी, राजेंद्रजी पाटील, बबलू पावडे, अशोकराव नेपटे, तहसीलदार मालठाणे, मुसढे, ढोपे मॅडम यांच्यासह  सहकारी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
   महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत ज्वारी – बाजरी – मका खरेदी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी FAQ या पिकाचे 2738 रुपये प्रति  क्विंटल आणि मका FAQ या पिकाचे 1870 रुपये प्रति क्विंटल या दराने शासकीय गोडाऊन वरुड येथे खरेदी सुरु झाली आहे.
      वरुड तालुक्यात ज्वारी मका उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने मक्‍याचे चांगले उत्पादन हाती आले . शिवाय रब्बी हंगामातही बऱ्याच क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली होती . लॉकडाऊनमुळे मकाला गुणवत्ता असूनही पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नव्हता, महाराष्ट्र शासनाने आता मका ज्वारी तसेच बाजरी शासकीय आधारभूत किमतीत खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे आ. देवेंद्र भुयार म्हणाले.