जळगाव । जिल्ह्यात अनियमित पाऊस सुरु असून त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. तसेच पावसाळा लांबत चालल्याने काही भागात पाणी टंचाई देखील जाणवत आहे.
सर्वांनाच पावसाची आस लागली आहे. जिल्ह्यात चांगल्या पावसासाठी जळगाव शहरात महिलांनी धोडी काढून वरुणराजाकडे पावसासाठी साकडे घातले आहे. ’बरस रे बरसे मेघू राजा बरस रे’ अशी हाक महिलांनी धोंडीच्या माध्यमातून दिले आहे.