मुंबई: बॉलीवूडचा एनर्जेटिक स्टुडन्ट म्हणजेच वरुण धवनने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात स्वत: स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे उत्तम अभिनय करणारा हा कलाकार आता निर्मिती क्षेत्राकडे वळणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
वरुणने आपल्या वडीलांना अनेक चित्रपटांमध्ये सहकार्य केलं होतं. मात्र आता वरुण त्याचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस लॉन्च करणार आहे. यावेळी वरुणला मोठा भाऊ, वडील डेव्हिड धवन आणि चित्रपट निर्माता रोहित यांची साथ मिळणार आहे. सध्या फक्त या नव्या प्रोडक्शन हाऊसविषयी चर्चा सुरु असून २०१९ पर्यंत या प्रोडक्शन हाऊसचं लॉन्चिंग करण्यात येणार आहे. मात्र याविषयी वरुणने अद्याप काही स्पष्ट केलं नसून लवकरच त्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.